ताज्या घडामोडी
मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे व सुजित चौधरींने कंबर कसली! दोन रेतीची वाहने ताब्यात घेतली


प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
बल्लारपूर तालूका जिल्ह्यात छोटा जरी असला तरी या ठिकाणी अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची जततेची ओरड सुरू होती .या बाबतीत वारंवार बातम्या प्रकाशित होत होत्या .आपच्या तर एक युवा नेत्याने ही अवैध रेती बल्लारपूर शहरात एव्हढ्या मोठ्या प्रमाणात येते कशी असा थेट सवाल देखील केला होता.उशिरा का होईना महसूल प्रशासनातील बल्लारपूरचे मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे व कोठारी मंडळाचे मंडळ अधिकारी सुजित चौधरी यांनी कंबर कसली त्यांनी नुकतेच अवैध रेतीची दोन वाहने पकडली .ती दंडात्मक कारवाई साठी तहसिल कार्यालयात जमा केली असल्याचे वृत्त आहे.