प्रादेशिक पाणीपुरवठा योजना नागरिकांना देत आहे जंतुसदृश्य पाणी
ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा
गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली.या पाणीपुरवठा योजनेतून आसपासच्या सात गावातील नागरिकांची तहान भागविल्या जाते मात्र ह्या ना त्या कारणाने सदर प्रदेशिक पाणीपुरवठा योजना नेहमी चर्चेत असते.अशातच आज दिनांक 5 ऑगस्टला विठ्ठलवाडा गावातील नागरिकांनी पिण्याचे पाणी भरले असता जंतूसदृश्य पाणी आढळून आल्याने गावात कमालीची भीती पसरली आहे.एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे गावात डेंग्यूसदृश्य तापाची साथ पसरली आहे.पावसाळ्याचे दिवस सुरु आहे त्यामुळे बहुतेक आजार पाण्यातूनच होत असतात आणि आज पिण्याच्या पाण्यात जंतू आढळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावात दोन ते तीन दिवसाआड पिण्याचे पाणी सोडल्या जाते.मागील महिन्यात तर सतत पंधरा दिवस दिवस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद होती त्यामुळे ऐन पावसाळ्यात गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.आणि आता जांतुसदृश्य पाणी आढळल्याने सत गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यामुळे पाणी प्यायचे कुठले असा प्रश्न उपस्थित होत आहे.