रेल्वेने प्रवास करत उमेदवारी अर्ज दाखल करणार-सखाराम बोबडे पडेगावकर
प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
बुधवारी गंगाखेड ते परभणी असा रेल्वे प्रवास करत लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी दिली.
सात आठ वर्षापासून मतदार संघात बांधणी करत असलेले लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आचारसहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्जाच्या खर्चासाठी मतदारांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. याला मतदारसंघातून व राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मतदारांनी आपल्या कष्टाचा एक एक रुपया जमा करून मला दिलेला आहे. या पैशाचा योग्य विनियोग करणे हे माझे काम आहे. उमेदवारी अर्ज भरताना कसलाही बडेजाव न करता मूळ गाव असलेल्या पडेगाव तालुका गंगाखेड येथुन बुधवारी सकाळी रेल्वे प्रवास करत परभणी येथे सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आज माझ्या गावचे रेल्वे स्टेशन चालू असते तर गावातूनच परभणीला रेल्वे प्रवास करता आला असता अशी खंत ही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. खासदार झाल्यानंतर सर्वप्रथम आणि तीस वर्षापूर्वी बंद पडलेले गंगाखेड परळी लोहमार्गावरील पडेगाव (बनपिंपळा) हे रेल्वे स्टेशन सुरू करण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने पुढाकार घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम शेतकरी, कष्टकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले.
संपर्क साठी 9511922000