गोपाळा फाउंडेशन यांचा सर्व प्रत्येक सामाजिक संघटनेने आदर्श घ्यावा राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
गोपाळा फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्याच्या वतीने गोपाळा फाउंडेशन परभणी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष समाजसेवक संतोष भाऊ खराटे यांच्या परभणी जिल्ह्यातील निर्धार महिलांसाठी गिरणी वाटप शिलाई मिशन वाटप वेगवेगळ्या व्यवसाय उद्योग धंद्यासाठी आर्थिक सोर्स वाढण्यासाठी त्यांना उद्योगधंद्यासाठी मदत म्हणून हे एवढ्या अनेक वस्तू ते वाटप करत असतात हजारो महिलांना उद्योग धंद्यावर नेलेले आहे तसेच हजारो युवक युवतींना शैक्षणिक साहित्य वाटप करणारे तसेच आज त्यांच्या स्वतःचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून गोरगरीब जनतेसाठी व एक गरीब कुटुंबास शैक्षणिक दोन जुळ्या मुलींना शैक्षणिक साहित्य वही पॅड दप्तर वॉटर डब्बा बॅग शिक्षणासाठी सर्व लागणारे बारावीपर्यंत मोफत हे सर्व साहित्य व ट्युशन साठी विविध ठिकाणी आपण सहकार्य करणार असे या ठिकाणी संतोष खराटे यांनी आतापर्यंत हजारो निर्धार महिलांना शिलाई मिशन पिठाची गिरणी उद्योगधंद्यासाठी अनेक प्रकारचे वस्तू उपलब्ध करून देतात तसेच हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी एक मे 17 सप्टेंबर या अनेक स्वातंत्र्य महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना सर्व लागणारे शैक्षणिक खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करतात म्हणून आज त्यांचा स्वतःचा वाढदिवसाचा औचित्य साधून इतर खर्च टाळून गोरगरिबांसाठी हेच दोन मुली शिक्षणासाठी जुळ्या दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून हा वाढदिवस साजरा अशी संकल्पना प्रत्येक समाजसेवकांनी व कार्यकर्त्यांनी व राजकारणातल्या व्यक्तींनी करावी असे मत राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी व्यक्त केले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र जन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर व प्रमुख अतिथी गोपाळा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ खराटे प्रमुख पाहुणे जेसीबी ऑपरेटर दत्ताभाऊ दुधाटे राऊत सर कार्यक्रमाचे आयोजक गोपाळा फाउंडेशन परभणी चे सदस्य कुष्णा शिंदे शांतिनिकेतील कॉलनी परिसर
सर्व गोपाळा फाउंडेशन चे पदाधिकारी व सर्व शैक्षणिक साहित्य व नागरिक उपस्थित होते अशी माहिती राष्ट्र जन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.