ताज्या घडामोडी

नगर परीषदेच्या वतीने थकबाकी धारकांची वसुली मोहीम सुरू

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी शहरातील सर्व मालमत्ताकर , पाणीहीकर धारकांनी व जागा गाळा किराया धारकांनी तातडीने नगर परिषदेचे थकबाकी करांची वसुली भरणा करुन घेण्यात यावे . अन्यथा पाथरी नगर परिषद मार्फत थकबाकी धारकांचे गाळे सिल करण्यात येणार आहे व पाणीपट्टीकर न भरणा करणारे नागरिकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येणार आहे . याची सर्वांनी नोंद घ्यावी . तसेच पाथरी शहरा तील सर्व नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आपण आपले मोकाट जनावरे बैल , गायी , म्हशी , बकन्या , इत्यादी बांधून ठेवाव्यात अथवा त्यांचा सांभाळ स्वतः करावा . सार्वजनिक रस्त्यावर मोकट जनावरे आढळून आल्यास नगर परिषद पाथरी त्या जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याचे नियोजन करुन संबंधीत जनावरांच्या मालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात येईल . वरील दोन्ही मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन श्रीमती कोमल सावरे , मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी यांनी केले आहे . या मोहिमेमध्ये पाथरी नगरपरिषदेचे कर्मचारी श्री बि.यु. भाले , श्री आर . व्ही . विश्वामित्रे , श्री मुशिरोद्दीन फारा ` खी , श्री सय्यद वाजेद अली , श्री संतोष हुले , श्री अन्सारी रब्बानी , श्री जमील अन्सारी , श्री मुंजा बेदरे , श्री शेख मुस्तफा , श्री नजीर अहेमद खान , श्री शेख समीर , श्री मुख्तार खान इ . सहभागी होते .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close