अंबुजा सिमेंट फाऊंडेशन तर्फे भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनी
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
दि.11/3/2023 ला तालुक्यातील चिखलापार येथे अंबुजा सिमेंट फाउंडेशन व गट ग्रामपंचायत महालगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली.श्री मा. कमलेश नागपुरे सर लोकेशन इन्चार्ज उमरेड , मा.आशीष देशमुख सर पीयु मॅनेजर,मा.अभिनव घुगे सर पीयु मॅनेजर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनी मध्ये कापूस या आपल्या परीसरात होणार्या प्रमूखपिकाविषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमूख मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा.डाॅ.नारायण लांबट सर कृषी भुषण पुरुस्कृत, चिखलापार ,मा.राजेश जारोंडे सर तालूका कृषि अधिकारी,भिवापूर सौ.सोनाली गजबे मॅडम
तालुका कृषी अधिकारी,उमरेड
मा.अशोक अग्रवाल सर जैन ड्रिप इरिगेशन मा. गौतम कांबळी सर
District research person
तसेच कार्यक्रमाचे प्रमूख अथिती
श्रीमती.नेमावली माटे जिल्हा परिषद सदस्य,श्रीमती.मधुरीताई देशमुख पंचायत समिती सभापती, भिवापूर मा.पांडुरंग जी घरत
उपसरपंच, चिखलापार मा.पांडुरंगजी नाखाडे पोलिस पाटील, चिखलापार वरील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सूत्रसंचालन पूनम खंडारे व गजानन गायकवाड यांनी करून प्रकल्पाच्या कार्याची माहिती दिली,कार्यक्रमाचे प्रास्ताविक ACF-BC प्रकल्प समन्वयक मा.श्री.प्रमोद मेश्राम सर यांनी केले
मार्गदर्शकांनी शेतकर्यांना कापूस पिकाचे व्यवस्थापन,मातीचे महत्व,जैविक घटकांचे महत्व,जैवविविधता,आर्थिक सक्षमता,विविध उद्योग,शेतकर्यांसाठी असणार्या शासकीय योजना,पर्यावरण रक्षण विषयावर मार्गदर्शन केले.मा.राजेश जारोंडे सर तालुका कृषी अधिकारी भिवापूर यांनी शेतकऱ्यांना विविध पिकाची माहिती दिली व जमिनीचा पोत चांगला कसा ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले.सौ.सोनाली गजबे मॅडम तालुक कृषी अधिकारी उमरेड यांनी माती परीक्षनाचे फायदे व विविध योजनांची माहिती दिली. मा गौतम कांबळी डिस्ट्रिक्ट रिसर्च पर्सन, कृषी विभाग ,यांनी महिलांसाठी लघु उद्योगासाठी असलेल्या योजनांची माहिती दिली माननीय अशोक अग्रवाल सर, ड्रीप इरिगेशन यांनी सुद्धा ठिबक सिंचनाचा योग्य वापर कसा करायचा याची माहिती दिली.
कापूस पिकाचे धसकट न जाळता ते बारीक करून शेतामध्ये कुजवावे त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करावा याची माहिती चिखलापारचे शेतकरी मा. अमित सायसे यांनी दिली तसेच पीक व्यवस्थापन, गांडूळ खत, दशपर्णी अर्क, ओझोला, जैवविविधता, ठिंबक सिंचन, इम सोल्युशन इत्यादी कृषी प्रदर्शनी साठी स्टॉल ठेवण्यात आले. माती वाचवा जग वाचवा या नाटकांमधून अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी यांनी मातीची काळजी, खताचा कमी वापर, बंद रासायनिक कीटकनाशकाचा वापर करू नये. गाडी चालवताना हेल्मेट चा वापर करावा इत्यादी विषय नाटकातून सादरीकरण करून मोलाचा संदेश दिला जल सप्ताह आयोजित करून पाण्याविषयी जनजागृती करण्यात आली त्यासोबतच रांगोळी स्पर्धेचे व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला चिखलापार, पांजरेपार महालगाव,सालेभट्टी,नांद तसेच परिसरातील आजूबाजूच्या गावांमधून शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शविली
कार्यक्रमाला अंबुजा सिमेंट फाउंडेशन उत्तम कापूस उमरेड लोकेशनचे सर्व प्रक्षेत्र अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहून यशस्वीरित्या कार्यक्रम पार पाडण्यात आला.