ताज्या घडामोडी

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती तर्फे निराधार फासेपारधी विकास संस्थेमध्ये गरिब, निराधार मुलांना कपडे व धान्य देऊन वाढदिवस व नववर्ष साजरे करण्यात आले

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

अमरावती : आयुष्य जगत असतांना आपल्या वाट्यातल समाजातील गरिब,निराधारांना परत करण्याचे आपले पहिले समाजिक दायित्व समजुन पोलीस मिञ परिवार समन्वय समिती अमरावती जिल्हाध्यक्ष कैलाशजी विंचुरकर यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे व नवीन वर्षाचे औचित्य साधून फासेपारधी विकास संस्थे अंतर्गत गरिब, निराधार पारधी समाजातील ५ ते 14 वर्षाच्या मुलांना पारधी समाजाची संस्थापक अध्यक्षा निकिता पवार या शाळाबाह्य मुलांना एकत्रित करून राजुरा येथील पडीत जमिनीवर झाडांच्या खाली मुलांना शिकविते त्यांना शालेय मध्यांत जेवण पण देते.

मुले जेवणाच्या आशेने शिकायला येतात निकिता पवार यांनी या मुलांनसाठी एकच ध्यास घेतला आहे की माझ्या समाजाची मुले गुन्हेगारी पासून दूर होऊन शैक्षणिक क्षेत्रात रुजुन पारधी समाजाची होत असलेली विटंबना थांबवण्यासाठी या मुलांनी शिक्षण प्रवाहात यावे याकरिता त्यांची सतत धावपळ सुरु असते.पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे महासचिव राजेंद्र तांबेकर यांना निकिता पवार कधी जेवणा विषयी,कधी कपड्यांन विषयी व ईतर समस्या विषयी वेळोवेळी माहिती देतात.समितीचे सचिव त्याची गंभीर दखल घेऊन अमरावती पदधिकाऱ्यांना फोन करून गरीब,निराधार लहान मुलांच्या भोजना करीता धान्य नाही आपण मदत केली पाहिजे याकरिता सर्व पोलीस मित्र परिवारांतील पदधिकारी यासाठी सदैव तयार असतात.
पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष संघपाल उमरे साहेब,महाराष्ट्र राज्य मुख्य सल्लागार सुभाषजी सोळंके यांच्या मार्गदर्शनखाली व अमरावती जिल्हा अध्यक्ष कैलासजी विंचुरकर,महासचिव राजेंद्रजी तांबेकर,विदर्भ प्रमुख मनीषजी गुडघे,तालुकाध्यक्ष कुंदन गजभिये,प्रसिद्धी प्रमुख ओंकार एंगल,धनराज खरसान,श्याम इंदुरकर,अरविंद विंचुरकर इमरान शहा यांच्या नेतृत्वाखाली कैलाशजी विंचुरकर यांचा मुलाच्या वाढदिवसा निमित्त व नववर्षा निमित्त शाळेतील सर्व गरीब,निराधार मुलांना कपडे वाटप करण्यात आले सोबतच त्यांना शाळा मध्यांत जेवणा करीता गहू,तांदूळ देण्यात आले,मुलं पारधी समाजाची जरी असली तरी शिक्षणात मुलं खूप हुशार आहेत.आपण त्यांना शिक्षणाकरिता यथाशक्ती मदत केली पाहिजे ही मुलं गुन्हेगार क्षेत्रातून वळून सभ्य शिक्षणाचे व माणुसकीचे धडे घेऊन,गुन्हेगारी प्रवृत्तीतून बाहेर येऊन व भीख मागण्यासारखे प्रकार थांबेल तेव्हाच सुसंस्कृत नवसमाज घडेल याकरिता उचित समाजाने यथोचित या समाजाला मदत व सहकार्य करायला हवे तेव्हाच समाजातून गुन्हेगारी समूळ नष्ट होईल व नवासमाज निर्माण होईल.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close