संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवशी ट्रॅक्टर वाटप
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी शेतीसोबतच महिलांनी औद्योगिक क्षेत्रात पाऊल टाकण्याची अपेक्षा व्यक्त केली
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे 30 जून बुधवार रोजी वाढदिवस होते. वाढदिवसाचे औचित्य साधून अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे रमाई महिला बचत गटला कृषी मानव विकास मिशन अंतर्गत ट्रॅक्टरचे वाटप राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाअध्यक्षा शाहीन भाभी हकीम, रा.काँ. च्या ज्येष्ठ नेत्या आशाताई पोहणेकर, रमाई महिला बचत गटचे अध्यक्षा पोमीला दुर्गे, सचिव किरण दुर्गे, अमोल दहागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
चिंतलपेठ येथील रमाई स्वयंसहाय्यता महिला बचत गटला ट्रॅक्टरचे पूजन व फित कापून ट्रॅक्टरची चावी भाग्यश्रीताई आत्राम यांनी महिला बचत गटला सुपूर्द केल्यानंतर म्हणाल्या की, आता शेतीसुद्धा महिलांनी आधुनिक पद्धतीने फुलवून आर्थिक उन्नती साधावे, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या खास वाढदिवशी कृषी मानव विकास मिशन अंतर्गत महिला बचत गटला कृषी विभागा अंतर्गत ट्रॅक्टर सुपूर्द करीत असल्याने याचे आनंद व समाधान होत असून ट्रॅक्टरचा उपयोग प्रामुख्याने शेती व सोबतच अन्य अवजड कामासाठी उपयोग करून शेतीसोबतच औद्योगिक क्षेत्रात पाऊल टाकावे व मिळालेल्या संधीचे सोने करावे अशी अपेक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी व्यक्त केले.
यावेळी चिंतलपेठ येथील वच्छला चूनारकर, मारुबाई करमे, बेबी डोंगरे, निरंजन दुर्गे, तनश्री दुर्गे , प्रवीण दुर्गे, रामचंद्र दुर्गे आदी उपस्थित होते.