ग्राम पंचायत पळसगांव येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा
शहर प्रतिनिधी : संजय दडमल नेरी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आणि जीवनचरित्राचा जागर व्हावा यासाठी राज्य सरकारने शिव स्वराज्य दिन साजरा करण्याचे निश्चित केले होते त्या अनुषंगाने आज दिनांक ६जून ला सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालय पळसगांव या ठिकाणी आज गुढी उभारून सर्व पदाधिकारी यांनी गुढी चे पूजन करून महाराष्ट्र गीत, राष्ट्रगीत,सादर करून उत्सव साजरा करण्यात आला.
कोरोना प्रतिबंधाबाबत शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा दिन साजरा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.या वेळी सरपंच सरिता गुरनुले, प्रभाकर गजभिये,संजय सोनेकर,हाफिज शेख, संगीता चौधरी,ग्राम पंचायत सदस्य,अरुण उंधिरवाडे ग्राम पंचायत सचिव ,विकास खोब्रागडे, संगणक परिचालक,सुधीर जुमडे,भक्तदास कोहचाडे,गणेश कोहळे व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते