चिमुर-कांपा मार्गावरील डांबर प्लॉन्टचे अतिक्रमन हटवा
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
सार्वजनिक बांधकाम उप विभागाला शिवसेना द्वारे देण्यात आले निवेदन.
चिमुर तालूक्यातील चिमुर-कांपा राज्य मार्गावरील मालेवाडा गावालगत डांबर प्लॅन्टचे कंपाउंड सरकारी जागेवर केलेले असल्यामुळे सदर अतीक्रमणबाबत चौकशी करून कायदेशीर हटवीण्यात यावी.
हा कंपाऊंड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर बांधकाम करण्यात आला आहे.त्या मुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहणाला त्रास होत अाहे.डांबर प्लॅन्ट च्या गाड्या ह्या रोड वर उभ्या असतात.त्या जागेवर नदी चा पुल व मोड असल्याने कधीही अपघात होऊ शकतो.
सार्वजनिक बांधकाम विभागानी मौका चौकशी करून कायदेशीर अतीक्रमन हटवीण्यात यावा.या साठी शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देताना शिवसेना उपतालूका प्रमुख केवलसिंग जुनी,विभाग डॉ.कृष्णकुमार टोंगे, केशव नंनावरे,शाखा प्रमुख तुकडू ठाकरे इत्यादी शिवसैनीक उपस्थीत होते.