ताज्या घडामोडी

नेरी येथील बँक ऑफ इंडिया समोर टू व्हीलर ने पेट घेतला

घटना वेळीच लक्षात येताच मोठा अनर्थ टळला.

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

दि.3जून 2022 ला दुपारी 12.35 वाजता बँक ऑफ इंडिया समोर उभ्या असलेल्या गाडीला अति उष्णतेमुळे आग लागली. गाडी मालक यांच्या लक्षात येताच त्यांनी पाइपद्वारे पाणी मारून आगविझवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
सविस्तर वृत्त असे आहे की बँक ऑफ इंडियाच्या कामानिमित्त नेरी येथे सरडपार येथील ग्राहक गुलाम सरवर शेख व त्यांचा नातू नवाज सलाम शेख हे दोघे बँक ऑफ इंडिया मधील कामानिमित्य बँकेत होंडा शाईन गाडी क्रमांक MH34 Bk 2145 या गाडीने आले. बँक ऑफ इंडिया येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी असून तेथे ग्राहकांना आपली वाहने उभी करण्यासाठी स्पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे ग्राहकांना आपली वाहने उन्हातच रोडवर उभी करून बँकेचे काम करावे लागते. त्यामुळे शेख यांनी आपली गाडी उन्हातच उभी करून बँक ऑफ इंडिया येथे कामानिमित्त बँकेत गेले व बँकेतील काम आटपून परत गाडी कडे आले असता अति उष्णतेमुळे गाडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच स्वतः त्यांनी शेजारील घरून बोरवेलचा पाईप घेऊन गाडीवर पाणी मारल्यामुळे आग आटोक्यात आली व समोर होणारा मोठा अनर्थ टळला परंतु यात गाडीमालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बँक ऑफ इंडिया नेरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते तेथे अनेक समस्या असून स्पार्किंग ही सर्वात मोठी समस्या आहे त्यामुळे ग्राहकांना आपली वाहने रोडवरच उभी करतात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो तेथे अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच बँक पासबुक वर मागील तीन-चार वर्षापासून एन्ट्री होत नसल्यामुळे कुठले पैसे खात्यात जमा झाले किंवा खात्यात किती पैसे शिल्लक आहे हे मात्र कळू शकत नाही त्यामुळे बँक ऑफ इंडिया येथील असणाऱ्या समस्या वरिष्ठ पातळीवरून सोडून ग्राहकांना होणारा मनस्ताप आणि अडचणी सोडवाव्यातअशी मागणी जोर धरू लागलेली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close