शिवशक्ति दुर्गोत्सव मंडळ नेरी इथे इंजि. पवनजी दवंडे यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी:राहुल गहुकर
मौखिक परंपरेने चालत आलेली प्रयोगरूप कला म्हणून कीर्तन या प्रकाराकडे पाहिले जाते. नवविधा भक्तीतील भक्तीचा दुसरा प्रकार म्हणूनही कीर्तनाची ओळख आहे. हे पारमार्थिक अधिष्ठान या कला प्रकाराला लाभल्याने कीर्तनाकडे केवळ भक्तिभावाने पाहिले गेले.त्यामुळे या कलेच्या प्रायोगिक व कलात्मक अंगाकडे दुर्लक्ष झालेले दिसते. कीर्तन हा जसा सामूहिक भक्तीचा एक प्रकार आहे तसाच ती सादरीकरण होणारी नाट्यासारखी प्रायोगिक कला आहे. संगीत, नाट्य नृत्य, साहित्य, वक्तृत्व या कलेचा समन्वय कीर्तनात होतो. तसेच नाटकाप्रमाणे ही कला समूहासमोर प्रत्यक्ष सदर होत असल्याने ही कला अधिक समूहिष्ठ समजली जाते. किर्तनाचे आणखी वैशिष्ठ्ये म्हणजे ज्या काळात कोणत्याही प्रकारचे शिक्षण आणि मुद्रण कलेची सुविधा उपलब्ध नव्हती, त्या काळात लोकशिक्षणाचे व साहित्याच्या प्रसार, प्रचाराचे आणि समाजप्रबोधनाचे, प्रभावी असे कार्य कीर्तनाने केले. या दृष्टीने विचार करता कीर्तन ही परंपरा एकाच वेळी पारमार्थिक, रंजनात्मक, प्रबोधनात्मक आणि प्रकाशनात्मक, प्रसारात्मक असे पंचविध कार्य करते. या माध्यमाचे हे अनेकविध पैलू आहेत.

शिवशक्ति दुर्गोत्सव मंडळ नेरी येथे सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजि. पवनजी दवंडे यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष :- श्री संजय भाऊ डोंगरे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक :- डॉ. सतीश भाऊ वारजुरकर , कमलाकरजी लोणकर , डॉ.श्यामजी हटवादे ,लताताई पीसे ,अक्रम शेख कोंडुजी दडमल , गिरीधर वांढरे व गावकरी उपस्थित होते