भिसी येथे शालास्तरिय विज्ञान प्रदर्शनी संपन्न
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
विज्ञान प्रदर्शनी हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे.
त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर विद्यार्थ्यांनी नाव उंचवावे यासाठी भिसी येथे श्री साई कॉन्व्हेन्ट व जिवीका इंग्लिश मिडीयम स्कूल, मध्ये दि. 28 नोव्हेंबर 2023 ला शाळास्तरिय एकदिवसीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक विद्यार्थ्यानी उस्फुर्त सहभाग घेतला यामध्ये विद्यार्थांनी अनेक नवीन मॉडेल तयार करून सादरीकरण केले या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून ताराचंद रामटेके (केंद्रप्रमुख आंबेनेरी केंद्र), सतिश थुटे, विजयकुमार घरत (सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली), प्रा. डॉ. नत्थू गिरडे, प्रदिप कामडी (माजी प. स. सदस्य), तिलक बांगडे, पंकज गाडीवार, यशवंत भुजाडे सर, राकेश भुजाडे, धनंजय सहारे,
मार्गदर्शक शिक्षक म्हणून प्रफुल्ल जांभुळे , हर्षित उपाध्याय, तुषार बुचे, राखी खेळेकर , अमृता देवतळे , प्रियंका शेंदरे, शितल नवनागे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.