वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या तत्वज्ञानाचे विचार घराघरात पोहचवा

श्रीगुरुदेव सेवा मंडळ,नेरी ५५ वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त सेवा सप्ताह संपन्न
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
नेरी:- श्रीगुरुदेव सेवा मंडळ,नेरी यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या.पुण्यतिथी महोत्सव सोहळा संगीतमय, ग्रामगीता, तत्वज्ञान, प्रचार,प्रसार सप्ताह दि.२१ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२३ पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.आज शेवटचा दिवस समारोपीय गोपालकाला (महाप्रसाद) व राष्ट्रवंदना या कार्यक्रमाला गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते, व चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ ऊर्फ कीर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपालकाला संपन्न…

या सेवा सप्ताहाला गुरुदेव भक्तांना मंत्रमुग्ध करणारे ह.भ.प.श्री.प्रा.डॉ.प्रशांत ठाकरे महाराज यांच्या वाणीतून प्रबोधन साकार झाले.
या समारोपीय गोपालकाला प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी गुरूदेव भक्तांना मार्गदर्शन करतांना आजच्या काळात वंदनीय राष्ट्रसंतांच्या विचारांची गरज,ग्रामगीतेतील विचार युवक बालगोपालांनी व महिलांनी आत्मसात करून त्या विचारांनुसार वाटचाल करण्याची गरज आहे, सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या तत्वज्ञानाचे विचार घराघरात पोहचवत राष्ट्रसंतांचे विचार मनामनात रुजविण्याची गरज असल्याचे मत खासदार अशोक नेते यांनी ५५ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्ताने केले.

याप्रसंगी प्रामुख्याने प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा गुरूदेव अनुयायी डॉ.श्यामजी हटवादे,
ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी मोर्चा चे राजूभाऊ देवतळे,प्रदेश सचिव युवा मोर्चा मनिष तुंपललीवार,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय नवघडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालु पिसे, शहराध्यक्ष सचिन खरकाडे, सरपंच नेरी सौ.रेखाताई पिसे, अध्यक्ष गुरूदेव सेवा मं.दादाराव पिसे,मंगेश चांदेकर,अशोक लांजेकर,राम राऊत,तसेच मोठया संख्येने गुरूदेव भक्त महिला बंधुभगिनी, युवक वर्ग , बालगोपाल उपस्थितीत होते.