ताज्या घडामोडी

टायगर ग्रुप चिमूर तर्फे वृध्द गरजूंना ब्लँकेटचे वाटप

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

टायगर ग्रुप संस्थापक जालिंदर जाधव यांचे प्रेरणेने राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव, टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष सूर्या अडबाले यांचे मार्गद्शनाखाली विकास जांबुडे यांचे वाढिवसानिमित्त चिमूर शहरातील गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप करण्यात आले,
मागील दोन वर्षांपासून चिमूर येथील रोहन नन्नावरे यांचे अध्क्षतेखालील टायगर ग्रुप चिमूर छोटे मोठे उपक्रम राबवित असून अपघात ग्रस्तांना मदत करणे, गरजू रुग्णांना तात्काळ रक्ताची व्यवस्था करून देणे, इत्यादी कार्या सोबत युवकांच्या मदतीने करत असतात, चिमूर येथील टायगर ग्रुप सदस्य विकास जांभूडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अनाथ वृध्द गरजूंना टायगर ग्रुप शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे यांचे नेतृत्वात शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते युवा सेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे यांचे उपस्थितीत ब्लँकेट वाटप करण्यात आले,
यावेळी विशाल शिवरकर, निखिल गिरी, पवन झाडे, दुर्वेश हजारे, मोहन हजारे, दिलीप लाडे, अजय मोहींनकर, पवन डोंगरवार, डेव्हिड मसराम, मनीष वाकुडकर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close