एम.एस.धोनी फॅन्स क्लब चिमूर तर्फे वृक्षारोपण
ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा
भारतीय क्रिकेटमधला सर्वात यशस्वी म्हणून ओळखला जाणारा कर्णधार एम. एस.धोनी याच्या वाढदिवसानिमित्त्य एम. एस.धोनी फॅन्स क्लब चिमूर तर्फे जिल्हा परिषद शाळा चिमूर (वडाळा पैकु) येथे वृक्षारोपण करण्यात आले. कोरोना माहामारिमुळे सामान्य माणसाला देखील ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे, अगदी सृष्टी अस्तित्वात असल्यापासून वृक्ष आपल्याला विनामूल्य ऑक्सिजन देत आहेत. कोरोना महामारीमुळे सामान्य माणसाला देखील ऑक्सिजनचे महत्व समजले आहे.प्रत्येकाने वृक्ष लावलेच पाहिजे आणि वृक्षारोपन करण्यासोबतच वृक्ष संवर्धन करणे गरजेचे आहे असे मनोगत एम.एस.धोनी फॅन्स क्लब चिमूर तर्फे करण्यात आले.
यावेळेस सुमेध भरडे,सौरभ चौधरी,आदित्य तांदूळकर,सुमित दडमल,सूरज हजारे या एम.एस.धोनीच्या चाहत्यांनी वृक्षारोपण करून माही ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.