नेरी – तळोधी बस मध्ये विद्यार्थ्याना बसण्यासाठी जागाच नाही

उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमुर तालुक्यातील नेरी वरून तळोधी बस मध्ये विद्यार्थ्याना शाळा सुटल्यावर गावाकडे जाण्यासाठी बसमध्ये जागाच नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे .
सध्या कोरोना काळ चालु असल्यामुळे काही अटी शर्थीवर शाळा , कॉलेज चालु आहे . यावर्षी शैक्षणीक वर्ष पुर्ण होते की काय याची शंका नीर्माण होत आहे .
नेरी येथे तीन विद्यालय व एक महाविद्यालय आहेत . येथे शिकण्यासाठी खुटाळा , सिरपुर , शिवणपायली , बोडधा , खाबांडा , मोटेगांव , गोरवट , म्हसली , कळमगांव येथील विद्यार्थी शाळा , कॉलेज शिकण्यासाठी येत असतात.
शाळेची सुट्टी झाल्यावर नेरी वरून गावाकडे जाण्यासाठी तळोधी , सिंदेवाही बस फुल्ल होत असल्यामुळे विद्यार्थ्याना बसण्यासाठी जागा होत नसल्यामुळे नाहक त्रास होत आहे .
विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जास्तच्या बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थी करीत आहे