ग्रामपंचायत मिंडाळा येथे “कृषीदिन” उत्साहात साजरा
ग्रामीण प्रतिनिधी : कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड
ग्रा. प. मिंडाळा येथे कृषी विभाग प. स. नागभीड च्या वतीने कृषीदिन साजरा करण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरितक्रांती चे प्रणेते श्री. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व पुष्प हार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात झाली. उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागातील अधिकारी मार्फत शेती विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मा.मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचें कृषीदिन निमित्य झालेलें मार्गदर्शन प्रोजेक्टर द्वारे शेतकऱ्यांना ऐकविन्यात् आले तसेच यंत्राच्या सहाय्याने धान रोवनिचे प्रात्यक्षिक करून दाखविन्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ प्रणयाताई गड्डमवार पं.स. सदस्य नागभीड़ , उद्घघाटक् भस्मे मैडम गट विकास अधिकारी नागभीड़,प्रमुख अतिथि श्री. तावस्कर साहेब कृषि अधिकारी नागभीड़ ,लोखंडे मैडम कृषि शास्त्रज्ञ सिंदेवाही, श्री. गणेश गड्डमवार सरपंच मिंडाळा, कृषी अधिकारी नैतामे साहेब,उईके साहेब,तिवारी साहेब,खोब्रागडे साहेब,धुमाळ साहेब,ग्रा. पं.सदस्य श्री.स्वप्निल नन्नावरे,सौ. पोर्णिमाताई नवघडे, सौ.चित्राताई मांदाडे, श्री .लतीश रंधये पो.पा. मिंडाळा उपस्थित होते. सुत्र संचालन श्रीमती उईके मॅडम ग्रामसेवक मिंडाळा यांनी केले.