राजमाता जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी शहर महानगरपालिका अंतर्गत दिनांक १२.०१.२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. राजमाता जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयुक्त धैर्यशील जाधव यांनी राजमाता जिजाऊ मॉं साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. यावेळी आस्थापना विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक, क्रिडा व सांस्कृतीक विभाग प्रमुख राजकुमार जाधव, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख उमेश जाधव, रोखपाल रमेश चव्हाण, स्विय सहायक युवराज साबळे, प्रल्हाद समिंद्रे, श्रावण कदम, विनोद पहारे आदी कर्मचारी उपस्थित होते.
जयंती साजरी केल्यावर आयुक्त धैर्यशील जाधव यांनी महापालिका कार्यालय व परिसर पहाणी करून सर्व विभाग प्रमुख यांनी नाकारा साहित्याची यादी तयार करणे, स्वच्छता मोहिम राबवुन कार्यालय परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना / निर्देश दिले.