जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये चमकले जिल्हा परिषद मानवत हायस्कूलचे खेळाडू
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मानवत : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य कोणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी व जिल्हा देनीकॉइट असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्रशाला मानवत येथे जिल्हास्तरीय शालेय रिंगटेनिस स्पर्धा उत्साहात संपन्न.
दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्रशाला मानवत च्या भव्य क्रीडांगणावर सदरील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये 14 वर्षाखालील सतरा वर्षाखालील 19 वर्षाखालील मुले व मुली या विविध वयोगटात खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
उद्घाटन या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद प्रशाला मानवत च्या मुख्याध्यापिका श्रीमती छाया गायकवाड तर उद्घाटक म्हणून मानवत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एम.टी चव्हाण उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हातेने कॉईट संघटनेचे सचिव कृष्णा कवडे मानवत केंद्राचे केंद्रप्रमुख उमाकांत हाडोळे जिल्हा परिषद प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असद खाॅन, उपाध्यक्षा अवचार मॅडम,आर्जुन वाघमार, संजय पत्रिके, मानवत तालुक्याचे क्रीडा संयोजक किशन भिसे, रेंगे सर, सुनील चौधरी, आनंद भिसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती तूपसमिंद्रे यांनी तर आभार प्रदर्शन शेख मुजीब यांनी केले.
एकूण 26 संघाने या स्पर्धेमध्ये आपले सहभाग नोंदवले.
या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्रशाला मानवत च्या खेळाडूंनी अतिशय चमकदारे कामगिरी करत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात जिल्ह्यामध्ये प्रथम पारितोषिक स्वतः वर्षे वयोगटात मुलांच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक तसेच 19 वर्षे मुलांच्या गटात परभणी जिल्ह्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळवले.
त्याच पद्धतीने 14 वर्षाखालील मुलींच्या गटांमध्ये भितेपर्यंत सतरा वर्ष वयोगटांमध्ये मुलींच्या गटात तृतीय स्थान पटकावले.