ताज्या घडामोडी

बॅ.असदुद्दीन आवैसी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पाथरी एम. आय. एम . पक्षाच्यावतीने जाहीर निषेध

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

पाथरी येथे एम. आय. एम .पक्षाच्यावतीने माननीय उपविभागिय अधिकारी तहसीलदार पोलिस निरीक्षक व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्टपती व राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये नमूद आहे की दिनांक 3 जानेवारी रोजी एम. आय. एम. पार्टी चे सर्वेसर्वा बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या जीवघेणी हल्ल्याचा जाहीर निषेध नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व दोषींना त्वरित अटक करून आगामी उत्तर प्रदेश राज्यात होणाऱ्या निवडणुका भयमुक्त वातावरणात पारदर्शक पणे पार पाडाव्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी या उद्देशाने उत्तर प्रदेश राज्यात केंद्रीय सुरक्षा बल पाठविण्यात यावे कायदा व सुव्यवस्था कायम करण्यात यावी या मागणीचे निवेदन उपविभागियअधिकारी तहसिलदार व पोलिस निरीक्षक पाथरी ,यांना देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष मुजिब आलम सय्यद जावेदअली अहमद अन्सारी सोहेल पठाण खिजर पठाण मोबिन पठाण शेख जुबेर सय्यद हनिफ मनिरिम यिदव खिजर फारोकी तालेब पटेल शेख अशफाक शेख अजहर हदगावकर रईस कुरेशी, एम.आय.एम. पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close