ग्रामपंचायत लोहारा येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी: राहुल गहुकर नेरी
नेरी वरून जवळ असलेल्या लोहारा येथे ग्रामपंचायत कार्यालयात हिंदवी स्वराजाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून राज्यभिषेक दिन म्हणून शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला या दिवसापासून शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणून नावारूपास आले हा दिवस मोट्या उत्सहाने ग्रामपंचायत लोहारा येथे संपन्न करण्यात आला
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून सौ दिक्षा शैलेंद्र पाटील सरपंच सौ गीता जांभुळे उपसरपंच अरविंद आदे ग्रामसेवक मान्यवर म्हणून उपस्थित होते सरपंच मॅडमनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक कसा झाला यावर मार्गदर्शन करीत लोकांना माहिती दिली तसेच स्वराज्याची ज्योत पेटवून हिंदवी स्वराज्याची निर्मिती कशी केली यावर सुद्धा मार्गदर्शन केले तसेच इतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला योगेश्वर ढोक भास्कर सावसाकडे हरीश डुमरे योगेश ढोक सर्व ग्रा प सदस्य ईश्वर दहीवले संगणक परिचालक आणि सर्व ग्रा प कर्मचारी गावातील नागरिक उपस्थित होते प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.