दलीत, शोषित, पिडीतांचा सामाजिक चेहरा डॉ. जितीन वंजारे रायमोह जिल्हा परिषद सर्कल लढवणार
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सामाजिक कार्य, समाजसेवा आणि राजकारण हे परस्पर संबंधित घटक असून सामाजिक कार्य ही राजकारणाची पहिली पायरी पायरी असते कारण राजकीय क्षेत्रामध्ये उतरल्याने सामाजिक कार्य करण्यास अधिक बळ मिळते. याच उद्देशाने शोषित, पीडित,दलित व दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जिततीनदादा वंजारे खालापूरीकर हे रायमोह जिल्हा परिषद निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद रायमोह सर्कल खूप वर्षापासून बऱ्याच योजनांपासून दुर्लक्षित आहे. रस्ते, शिक्षण,वीज जलसिंचन,विद्यार्थ्यांचे प्रश्न, बस सेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्राम स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, उद्याने,स्मशान भूमी, रस्ते, जनावरांसाठी पाणवठे, शेततळे, पानी मुबलक उपलब्धते साठी तलाव, बंधारे, बांध टाकून पानी अडवणे, नालीची स्वच्छ्ता इत्यादींच्या अनेक प्रश्नांनी ग्रासलेल्या या सर्कलला नवीन चेहरा देण्याची गरज आहे. ही मूलभूत गरज लक्षात घेता खालापूरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जीतीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी जिल्हा परिषद रायमोह सर्कल लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचे स्वागत जनसामान्य,दलित, शोषित, पीडित व दुर्लक्षित घटकांना आनंदित करणारा असल्याचे बोलले जात आहे.
बऱ्याच वर्षापासून आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे व वेगवेगळ्या आंदोलन,रास्ता रोको व निवेदने देऊन शेतकऱ्यांचे,विद्यार्थ्यांचे, गोर गरीब, शोषित पीडितांचे कैवारी डॉ जितीन वंजारे यांनी अनेक प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम केलें आहे व त्याला न्याय ही मिळाला आहे. त्यामूळे रायमोह जील्हा परीषद गटात त्यांची ओळख ‘सामान्यांचा बुलंद आवाज व खरासम्राट’अशी ओळख असणारे व आपल्या पहाडी आवाजाने अनेक सभा गाजवणारे डॉक्टर जितीन वंजारे हे वंचितांचा बुलंद आवाज असल्याचे बोलले जात आहे. डॉक्टर जीतीन वंजारे यांना नामांकित पक्षाची उमेदवारी मिळण्यास ते नक्कीच निवडून येतील या शंका नाही. समाजकार्याला राजकारणाची जोड दिल्यास त्यातून प्रगतशील व विकासात्मक राष्ट्र निर्माण होईल अशी अनुभूती स्वतःला असणारे व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे डॉ जितीन वंजारे यांचा जनसंपर्क दांडगा असुन खेडोपाडी चांगली ओळख असणारे उच्च सुशिक्षीत सामजिक राजकिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. याच ओळखीचा आणि लोकप्रीयतेचा विशेष फायदा घेउन सामन्याच्या हितासाठी निवडणूक लढवून गोर गरीबाना विकासात्मक न्याय देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बीड नवगण राजुरी खरवंडी रस्त्याची काम त्या रस्त्याचा मावेजा न देता शेतकऱ्यांची फसवणूक केली गेली होती. त्या विरोधात जाहीरपणे आंदोलने आणि निवेदन देऊन महाराष्ट्रातील असा एकमेव रस्ता आहे ज्याचं काम अगोदर झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मावेजा मिळाला यासाठी पाठपुरावा करणारे हेच ते डॉ.जीतीन वंजारे. गेवराई महसूल प्रशसनाचा सगळा सावळा गोंधळ बाहेर काढून पाच दिवस कलेक्टर ऑफिस ला अन्नत्याग आंदोलनं करुन पाच शासकीय अधिकारी चे निलंबन करण्यास भाग पाडले, विद्यार्थांची जादा फिस अकारणीवर अंकुश ठेवण्यात यावा यासाठी निवेदने दीली, अनेकांना निराधार योजनेतून लाभ मिळवून दिला, वैद्यकिय सेवा मोफत दिली, डॉकटर संघटनेच्या माध्यमातून डॉक्टरांच्या समस्या सोडवल्या, बीड रेल्वे साठी दिल्ली येथे रेल मंत्रालयावर आंदोलन केले, बीडच्या सिग्नल, रस्ते, ट्रॅफिक सुरळीत व्हावी, रिंग रोड आणि बायपास साठी आंदोलन केली, महागाई, गॅस सिलेंडर ब्लॅक विक्री बंद यासाठी आंदोलन केले, शासकीय शेतकरी बिलाविरोधात आंदोलन केली, दूध व शेतीमाल हमीभाव-भाव वाढ यासाठी आंदोलने केली. शेतकरी कर्जमाफी आंदोलनात अटक झाली, स्वाती राठोड अत्याचार प्रकरणात अटक झाली.अश्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आणि संबंधितांना न्याय मिळवून दिला अश्या अनेक सामजिक कार्यात सहभाग. अश्या या कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसलेल्या तरुण युवा नेत्यास योग्य सहकार्य भेटल्यास रायमोह जिल्हा परीषद सर्कल मध्ये एक सोनेरी युवापर्व चालू होइल ज्याचा फायदा विकासात्मक कार्याला होइल असे मत त्यांनी व्यक्त केले.