ताज्या घडामोडी

महिला मंडळ अधिकाऱ्यांनी आवळल्या माहिर रेती तस्करांच्या मुसक्या

वनिता रामटेकेंच्या दौऱ्यात काही रेती तस्कर झाले नदी घाटावरुन पसार

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

सध्या चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे चित्र दृष्टीक्षेपात पडत असताना राजूरा तालुक्यात अवैध रेती माफिया मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याची ओरड सातत्याने जनतेतून होत होती. परंतू अनेक वेळा सापळा रचूनही ते रेती तस्कर जाळ्यात अडकत नव्हते. बरेचदा महसूल पथकांना घटनास्थळा वरुन खाली हात परतावे लागत होते.अश्यातच राजूरा तहसिल अंतर्गत येत असलेल्या गोवरी सर्कलच्या महिला मंडळ अधिकारी वनिता रामटेके यांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला व भल्या सकाळी आज दोन माहिर रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेची माहिती तालूक्यातील इत्तर गावात वा-यासारखी पसरताच अन्य रेती तस्कर वाहनांसह नदी घाटावरुन पसार झाले .तेव्हा रेती तस्करांत एकच चर्चा गावात ऐकायला मिळाली ती म्हणजे ताईं दौ-यावर आली काम बंद ठेवा !
रविवार दि.३ मार्चला सकाळी गुप्त माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी रामटेके ह्या महिला पथक घेऊन मारडा येथे पोहचल्या या ठिकाणावरुन अवैध रेतीची वाहतूक करत असताना त्यांनी अवैध रेतीचे २ ट्रॅक्टर जप्त केले इतकेच नाही तर त्यांनी ते थेट दंडात्मक कारवाईसाठी राजूरा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जमा केले. सदरहु कारवाई राजूराचे उपविभागीय अधिकारी रविंद्र माने व तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांचे मार्गदर्शनाखाली त्यांनी केली. अवैध गौण खनिजांवर अंकूश व दंडात्मक कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवालांचा प्रामुख्याने समावेश आहे.दरम्यान आज रविवारी भल्या सकाळी महिला पथक प्रमुख वनिता रामटेके यांचेसह तलाठी पंचशिला भोयर, संघमित्रा गाडेकर, शमा सलीमखा पठाण कोतवाल चंद्रशेखर मादनेलवार, मारोती मेश्राम, राकेश देहारकर आदिंनी उपरोक्त कारवाई केली.या अवैध रेती वाहनांना महसूल पथकाने आज ताब्यात घेतल्यामुळे राजू-यातील रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close