ताज्या घडामोडी
रानडुकराचा हल्ल्यात दोन शेतकरी जखमी बरडघाट शेतशीवारातील घटना

बरडघाट शेतशीवारातील घटना .
प्रतिनिधीः हेमंत बोरकर
शुक्रवारी सायंकाळी खडसंगी पासून एक किलोमीटर अंतरावरील बरडघाट येथील दोन शेतमजुरावर रानडुकराने हल्ला करून जखमी केले.
खडसंगी ते बरडघाट येथील जाण्या येण्याच्या मार्गावर रोड लगत तराळे यांची शेती असून शेतातील कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास बैल झोपडीत बांधण्यासाठी आले होते. दरम्यान झुडपात दडून बसलेल्या रानडुकराने रामेश्वर तराळे व वसंता तराळे यांना जखमी केले. दोघानाही प्राथमिक आरोग्य केंद्र खडसंगी येथे उपचारासाठी दाखल केले असता रामेश्वर तराळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
वनविभागाने रानडुकराचा बंदोबस्त करावा ही मागणी स्थानिकांनी केली आहे.