शंभु शेक गोंडवाना क्रीडा मंडळ वेडमपल्ली यांच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचे उदघाटन

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न..!!
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.मेळपल्ली अंतर्गत येत असलेल्या वेडमपल्ली येते शंभु शेक गोंडवाना क्रीडा मंडळ वेडमपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हालीबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.भास्कर तलांडे प.स.सभापती अहेरी,ग्रामपंचायत मेळपल्ली चे सरपंच श्री.नीलेश वेलादी ,माजी सरपंच पेरमल्ली श्री.प्रमोद आत्राम होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.लक्ष्मण गावडे पोलिस पाटिल,शंकर गावडे गोंडी भुमक,बापू वेलादी ,शामराव वेलादी, बीचु गावडे,नारायण कुमरे, दिवाकर तलांडे ग्रा.प.सदस्य मेळपल्ली,बापू सुरमवार,दलसु आत्राम उपसरपंच मेळपल्ली,विलास वेलादी ग्रा.प.सदस्य,अविनाश कुमरे,हनमन्तु गावडे,श्रीनिवास गावडे,भगवान सिडाम ,विलास वेलादी, राजू वेलादी, सुधाकर वेलादी, शिवराम वेलादी तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते.