ताज्या घडामोडी

चिमुर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तर्फे उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे

चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी चिमूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा चिमूर चे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक धडकले चिमूर तहसील कार्यालय येथे,
खरिप पणन हंगाम २०२२-२३ मधिल शासकिय आधारभुत खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांना धान खरेदी सुरू करण्यासाठी शेतकरी नोंदणी करतांना हंगाम २०२२-२३ पासुन ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे, त्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपुर यांनी माहिती प्रकाशीत केली. मात्र वृध्द व प्रकृतीने अशक्त असलेल्या शेतकरी बांधवांना स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित होऊन प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे शक्य नाही.
अशा परिस्थीतीत उपरोक्त योजने पासून असे शेतकरी वंचित होऊ शकतात तेव्हा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. अगोदरच शेतकरी आपले दैनंदिन जिवन जगत असतांना अनेक अडीअडचणींना तोंड देत असतो त्यात वरिल जाचक अट घालणे म्हणजे प्रशासनाने शेतकऱ्यांची थट्टा करून वेठीस धरणे होय, याकरिता चिमूर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शाखा चिमूर यांनी दिले उपविभागीय अधिकारी (महसूल), उपविभागीय कार्यालय, चिमूर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
शेतकऱ्यांना महामंडळाकडून देण्यात येणारा ७००/- रू. बोनस हा वाढत्या महागाईनुसार १५००/- रू. पर्यंत वाढवुन देण्यात यावा. महागाईचा फटका जसा सरकारी कर्मचाऱ्याला बसतो व त्याचे वेतन वाढतात त्याचप्रमाणे महागाईचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन आर्थिक जिवणावर सुध्दा होत असतो त्यामूळे १५००/- रू. बोनस वाढवुन देण्यात यावा.
अन्यथा चिमूर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, शाखा चिमूर च्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी न्यायार्थ लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे आव्हान करण्यात आले, यावेळी उपरोक्त निवेदन हे सचिन खाडे शहर प्रमुख चिमूर, जेष्ठ नेते प्रा. दादाभाऊ दहिकर,माजी उपजिल्हा प्रमुख अनिलभाऊ डगवार, माजी तालुका प्रमुख सारंग दाभेकर, तानाजी साहारे,किशोर उकुंडे उपतालुका प्रमुख नेरी, जेष्ठ कार्यकर्ते देविदास गिरडे , मिडिया प्रसिद्धी प्रमुख सुनिल हिंगणकर , तालुका संघटक रोशन जुमळे,रमेश मडावी, सुरेश शिवरकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close