ताज्या घडामोडी

थकीत वेतन होणार अदा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कंत्राटी कामगारांचा प्रश्न मांडला होता आ.किशोर जोरगेवारांनी अधिवेशनात

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 336 कंत्राटी कामगारांचे थकीत असलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. या मागणीची दखल घेण्यात आली असुन सदरहु कामगारांचे थकीत वेतन अदा करण्याचे आदेश शासनाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यामुळे सदरहु कामगारांनी स्थानिक राजमाता निवासस्थानी येत आमदार जोरगेवार यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहे.
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील अनेक महत्वांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. चंद्रपूर मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी अनेक मागण्या सभागृहात बोलताना केल्या आहे. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील दुरावस्था सभागृहाच्या लक्षात आणुन देण्यासाठी त्यांनी लक्षवेधी उपस्थित करत येथील समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते.
या वेळी लक्षवेधीवर बोलतांना आमदार जोरगेवार यांनी येथील कंत्राटी कर्मचा-यांचा प्रश्नही उचलून धरला होता. कंत्राटाराला मुदतवाढ देण्यात न आल्याने येथे अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या जवळपास 336 कामागरांचे 5 महिन्यांचे वेतन थकीत असल्याची बाब त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली होती. आरोग्य सेवेचा महत्वाचा भाग असलेल्या या कंत्राटी कामगारांवर आर्थिक संकट कोसळल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देत कंत्राटदारास मुदतवाढ देत कामगारांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर या मागणीचा त्यांच्या वतीने सतत पाठपुरावा सुरु होता. तद्वतच हा प्रश्न त्यांनी उचलून धरला होता.
दरम्यान या मागणीची शासनाच्या वतीने दखल घेण्यात आली असुन सदरहु सर्व कामगारांचे वेतन तात्काळ अदा करण्यात यावे असे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अवर सचिव यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त यांना पत्राद्वारे दिले आहे. त्यामुळे आता लवकरच या सर्व कामगारांचे थकीत असलेले पाच महिण्यांचे वेतन अदा केल्या जाणार आहे. हा निर्णय होताच आज येथील सर्व कामगारांनी आमदार जोरगेवार यांच्या निवासस्थानी येत त्यांची भेट घेत त्यांचे आभार मानले. कामगार हा आरोग्य सेवेतील प्रमुख घटक आहे. त्यांच्या न्यायासाठी आपण सदैव त्यांचे सोबत राहणार असल्याचे आ.जोरगेवार यांनी शेकडों कामगारां समोर बोलताना म्हटले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close