ताज्या घडामोडी

वैष्णवीदेवी स्वयंसहायता समूह निर्मित दुकानाचे मा. अजहर शेख पंचायत समिती सदस्य यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी :हेमंत बोरकर

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती चिमूर अंतर्गत वैष्णवीदेवी स्वयंसहायता समूह मुरपार यांचे मौजा खडसंगी येथील दुकानाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर दुकानाचे उद्घाटन मा. अजहर शेख यांचे उपस्थितीत करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मा. गुरले सर सहा. शिक्षक जनता विद्यालय मुरपार, मा. मडावी सर तालुका व्यवस्थापक IBCB , मा. ब्राह्मणे सर तालुका व्यवस्थापक FI, मा. प्रमोद राऊत ग्राम पंचायत सदस्य , मा. हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जाईल असे मार्गदर्शन मा. अजहर शेख पंचायत सदस्य यांनी केले.
ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर अन्य वस्तूंना मोठी मागणी आहे.
सदर दुकानातून महिलांद्वारे गृहनिर्मित पापड, विविध प्रकारचे लोणचे, बुंदीचे लाडू, गुलाब जामून, दही, दूध, पनीर व इतर घरघुती लागणारे सर्व चविष्ठ पदार्थ ऑर्डर नुसार तयार करून मिळेल असे सौ. विना जीवतोडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. ममता सरपाते ICRP मुरपार, सौ. थुटे ICRP रेंगाबोडी व समूहातील सदस्य यांनी सहकार्य केलेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close