ताज्या घडामोडी

नेरी नवरगाव मार्गावर ट्रॅक्टर व दुचाकीचा अपघात

एकाचा मृत्यु एक गंभीर

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

चिमूर तालुक्यातील नेरी नवरगाव मार्गावर नेरी येथील केवळराम कामडी यांच्या घरासमोर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात आज सायंकाळी 5 वाजता सुमारास जोरदार अपघात झाला यात ट्रॅक्टर ने दुचाकी स्वाराला जागीच चिरडले यात दुचाकीस्वाराचा डोक्याचा भाग चेंदामेंदा झाल्याने जागीच ठार झाला तर मागे बसलेला दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्याला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे हे मोटेगाव येथील रहिवासी असून गोकुलदास मेश्राम आणि दिवाकर दडमल हे दोघे जण आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 34 बी क्यू 9778 ने नेरीला कामानिमित्त येत असताना आणि नेरीवरून सुसाट वेगाने जात असलेले बिना नंबरचे ट्रकटरने नेरी -नवरगाव रोडवर केवळराम कामडी यांच्या घरासमोर जोरदार धडक दिली आणि यात दुचाकी स्वार गोकुलदास मेश्राम यांच्या डोक्याला चेंदामेंदा झाल्याने तो जागेवरच ठार झाले तर मागे बसलेले दिवाकर दडमल याना गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना घडताच ट्रॅक्टर चालक फरार झाला सदर ट्रॅक्टर कोणाच्या मालकीचे आहे हे कळु शकले नाही नेरी परिसरात अवैध रेती तस्करीचे मुख्य केंद्र असून या परिसरातील अनेक नदी नाल्यावरून रेती तस्करी केल्या जाते महसूल विभाग अनेक कारवाया करते परंतु त्यांना सुद्धा चकमा देऊन जागोजागी माणसे ठेऊन रेतीतस्करी केली जाते आणि त्यांच्या ट्रॅक्टर भन्नाट वेगात असतात या अगोदर सुद्धा असे किरकोळ अपघात या रेतीतस्करामुळे झाले आहेत तेव्हा यांच्यावर जोरदार कारवाई करायला पाहिजे अशी मागणी मोटेगाव वासीय जनतेकडून होत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच चिमूर पोलीस स्टेशन चे पी एस आय शेख आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले प्रेताचे पंचनामा करून तपासणी साठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close