महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमीत्य स्नेहग्रामला धान्याची मदत

प्रतिनिधी:अहमद अन्सारी
‘काय कवे कैलास’ हा श्रममंत्र ज्या थोर क्रांतिकारी महापुरुषांनी दिला, पिढ्यानपिढ्या बहुजन समाजाला अज्ञानात ठेवून कर्मकांडाचे पांघरून घालून पद्धतशीरपणे शोषण करणाऱ्या वैदिक कर्मठांच्या विषमतावादी समाजरचनेच्या चिरेबंदी बुरुजास ज्यानी सुरुंग लावला. वंचित, उपेक्षित शुद्रातीशुद्राना एकत्र करुन त्यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी अनुभव मंटप ही लोकसंसद यांनी बाराव्या शतकात स्थापन केली. खऱ्या अर्थाने महिलांना 50 टक्के आरक्षण बाराव्या शतकात दिले. अनिष्ट प्रथा, परंपरा,अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद व वर्णभेद यावर ज्यांनी प्रहार केला त्यांचे नाव महात्मा बसवेश्वर महाराज. आज महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत बार्शीतील तरुणाईंनी समाजोपयोगी उपक्रम राबवत अनोख्या जयंती साजरी केली.
कोविड काळानंतर सामाजिक संस्थांसाठी विशेषतः निवासी सामाजिक प्रकल्पांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातही ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या संस्था मूलभूत प्रश्नांशी सामना करावा लागत आहे. शासकीय अनुदान नाही, नियमित देणगी नाही, तरीही खर्चाला अनेक वाटा आहेत. खरं तर ही कसरत कार्यकर्त्यांसाठी प्रचंड त्रासदायक ठरू पाहत आहे. अशा स्थितीत बार्शीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. दिनेश काटकर सर यांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुभाष नगर लिंगायत समाज बार्शी या ग्रुपच्या तरुणांना स्नेहग्रामचा पर्याय सुचवला. तेव्हा सामाजिक जाणिवेतून स्नेहग्रामला धान्य मदतीचा विचार पुढे आला. यासाठी सुभाष नगर लिंगायत समाज बार्शी पुढाकार घेऊन स्नेहग्रामला धान्याची मदत केली. यावेळी श्री. दिनेश काटकर सर, श्री. योगेश घंटे, श्री. मयुर सोनके, श्री. नितीन कोरे,श्री. अभि पुरवंत, श्री. रोहीत तोडकरी, श्री. नितीन कंटीमट,श्री. अनिल गारमपल्ली, श्री. मिलींद गाढवे,श्री. आकाश शेटे,श्री. शैलैश शेटे,श्री. शिवलिंग साबळे, श्री. सुमित जिरेकर ,श्री. अक्षय भुईटे, श्री.अभिजीत झाडे, श्री. किशोर कांबळे उपस्थित होते.
आपणही महापुरुषांच्या जयंती- पुण्यतिथी, प्रियजनांच्या वाढदिवस, पुण्यस्मरण व आयुष्यातील आनंददायी क्षणी सेवासहयोग देऊन वंचित मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकता..!!
महेश निंबाळकर, 9822897382
स्नेहग्राम, कोरफळे ता. बार्शी जि. सोलापूर