वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची खासदार अशोक नेते यांच्या कडून सांत्वन भेट व आर्थिक मदत…
प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
गडचिरोली तालुक्यातील मौजा- गोविंदपुर येथील सदर महिला स्व.माया धर्माजी सातपुते रा. गोविंदपुर ता. जि. गडचिरोली वय (५५ वर्ष) येथील रहिवासी असून सदर महिला काल दिनांक १५ डिसेंबर २०२३ ला दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान सरपण गोळा करण्यासंबंधित शेतशिवारात गावाच्या जवळपास काम करित असतांना अचानकपणे वाघाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार केलं.
या सदर घटनेची माहिती खासदार अशोक नेते यांना मिळताच लगेचच त्यांनी ठार झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेऊन यावेळी खासदार महोदयांचे हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
खासदार अशोक नेते यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करतांना या घटनेमुळे सभोवतालच्या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा असे निर्देश वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देत गावकऱ्यांनी जंगलात किंवा शेतावर जातांना एकटेच न जाता टोळीनेे जावे,हातात काठी घेऊन आपली खबरदारी घेत गावकऱ्यांनी शेतावर व जंगलात जावे.व आपली सावधगिरी बाळगावी अशा सुचना याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी दिल्या.
या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे,तालुकाध्यक्ष विलास पा.भाडेकर,गडचिरोली वनविभागाचे उपसंरक्षक अधिकारी मिलिश शर्मा साहेब, महिला आघाडी जिल्हा सचिव लक्ष्मी कलंत्री,से.नी.उपनिरिक्षक कान्होजी लोहबंरे,उपसरपंच प्रितम गेडाम, रवी मोहुरले,किसन गेडाम,शंकर मेश्राम, प्रकाश नैताम,विलास पिपरे,लोमेश कोहळे,तसेच मोठ्या संख्येनी गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला भगिनीं आणि वन अधिकाऱी कर्मचारी उपस्थित होते.