ताज्या घडामोडी

विद्यार्थीनींनी दिले शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाचे प्रशिक्षण

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित महारोगी सेवा समिति द्वारा संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा च्या अंतिम वर्षातील विद्यार्थीनींनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकर्यांना अझोला उत्पादनाचे प्रशिक्षण दिले.
अझोला ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती असुन यात प्रथिने– 22.2%, स्निग्ध पदार्थ– 2.9%, तंतुमय- 12.02%, क्षार – 18.3% शुष्क घटक- 7.10%,एनडीएफ- 46.10% आणि एडीएफ- 36.63% इत्यादी पोषक घटक आहेत. जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा पूरक म्हणून वापर करण्यात येतो. तसेच, भातशेतीमध्ये खत म्हणून गाडल्यास त्यातून नत्र उपलब्ध होते. दुग्ध उत्पादनाकारता शेतकरी पाळत असलेल्याला दुभत्या जनावरांना लागणाऱ्या महागड्या खुराकामुळे दुग्ध उत्पादनावरील खर्च वाढत असतो, खर्च कमी करण्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात अधिक चांगला नैसर्गिक वनस्पतिजन्य चारा म्हणजेच अँझोला वनस्पती दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशिर ठरतो त्यामुळे शेतकऱ्यांना अझोला उत्पादनाचे योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने टाकळी येथे विद्यार्थीनींनी हा उत्तम असा उपक्रम राबविला.
या विद्यार्थीनीं मध्ये कु. वंशिका नरेंद्र तिरणकर, कु. कोमल सुरेश उईके, कु. महिमा हरिदास वैद्य आणि कु. प्रियंका हरिभाऊ वैद्य यांचा समावेश होता. यासाठी आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा चे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. वी. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एन. पातोंड, डॉ. पी. के. आकोटकर व डॉ. एस. आर. ईमडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close