ताज्या घडामोडी

इंदापुर मध्ये घराला आग लागुन घर जळुन खाक

इंदापूर मध्ये जळालेल्या घराच्या सदस्यांना पं स. सदस्य राहुल मेश्राम तसेच समाजसेवकांचा धिराचा हात

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

आज दि.14/4/2021 ला विनोद मरापे रा. इंदापूर पो हिवरा हीवरी ता. भिवापूर या आदिवासी कुटुंबाचे घर आज सकाळी 10 वा. अचानक आग लागून घर पूर्णपणे जाळून खाIक झाले सकाळची वेळ असल्याकारणाने घरातील महिला आपले काम करत असताना आपल्या घराला आग लागल्याचे कळतच आरडाओरड केली असता गावातील सर्व महिला पुरुष व मुलेसुद्धा धाऊन येत घराची आग सर्वांच्या मदतीने विझवण्यात यश आले .कोणतीही जीवित हानी झाली नसून दुःखद प्रसंग असा की घरातील सर्व कपडे ,अन्नधान्य,टीव्ही कपाट आणि रोख 35000 रुपये जळाले. आग लागल्याचे पंचायत समिती सदस्य राहुल मेश्राम यांना माहिती मिळाली असता लगेच तेथे जाऊन घराची पाहणी केली व त्या कुटुंबाला धीर देत शबरी घरकुल योजनेतून घर मिळून देतो असे सांगितले घराचा पंचनामा करून शासनाकडून जेही मदत करता येईल ते मी स्वतः हा शासनाकडे पाठपुरावा करेल असे राहुल मेश्राम यांनी मारापे कुटुंबाला सांगितले गावातील सामाजिक कार्यकर्ते पद्माकर नारनवरे, ग्रामसेवक वालदे,कोतवाल मंगल चौहान,आशिष कुडमते,,प्रवीण गायकवाड ,संगीता गेडाम,वनिता नारनवरे,शोभा कुडमते इतर गावातील नागरिक उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close