ताज्या घडामोडी

शालेय फुटबॉल स्पर्धेत शहीद मिश्रा विद्यालय जिल्ह्यात प्रथम

विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हा प्रतिनिधी:संजय नागदेवे

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने २१ सप्टेंबर २०२६ रोजी इंदिरा गांधी स्टेडियम, गोंदिया येथे जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शहीद मिश्रा विद्यालय, तिरोडा येथील १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.
अंतिम सामन्यात शहीद मिश्रा विद्यालयाच्या संघाने गोरेगावच्या संघाचा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

या विजयामुळे संघाची नागपूर विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.विशेष म्हणजे तिरोडा तालुक्यातून शालेय फुटबॉलचा संघ प्रथमच विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तसेच शहीद मिश्रा विद्यालयाच्या इतिहासातही प्रथमच विद्यालयाचा फुटबॉल संघ विभागीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहे. आगामी नागपूर विभागीय शालेय स्पर्धेत सहा जिल्ह्यांमधून गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान या संघाला मिळाला आहे.या विजयी संघाला प्रशिक्षक तथा क्रीडा शिक्षक सुनील शेंडे आणि शैलेश बघेले यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्रजी झंवरिया, उपाध्यक्ष संजीव कोलते, सचिव उमाजी हरोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीकांत यादव, क्रीडा अधिकारी महाले, क्रीडा अधिकारी देशमुख, विद्यालयाचे प्राचार्य निकेश मिश्रा, उपप्राचार्या सीमा भाजीपाले, पर्यवेक्षक टी. डी. पटले, बोकडे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *