ताज्या घडामोडी

ना.तहसीलदार यांच्या पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करा व महसुल सहायकांची रिक्त पदे त्वरित भरा! आ किशोर जोरगेवारांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घेतली जाेरगेवारांनी भेट

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

अव्वल कारकून संवर्गातुन नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती प्रक्रिया मागील दोन वर्षापासुन थांबली आहे. तसेच महसुल सहायकाचे पदे भरण्यात आलेली नाही. त्यामूळे सदरहु पदोन्नती प्रक्रिया पुर्ण करुन महसुल सहायकांचे रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांना केली आहे. या संदर्भात आजच संबधित विभागाची बैठक घेत निर्णय घेणार असल्याचे आश्वासन ना. बाळासाहेब थोरात यांनी आ. जोरगेवार यांना दिले आहे.
आज बुधवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुबंई येथील मंत्रालयात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत सदरहु मागणी बाबत सविस्तर चर्चा केली. या मागणी करिता चंद्रपूरात महसुल विभागाच्या कर्मचा-यांचे गेल्या ४एफ्रिल पासून सुरु असलेल्या आंदोलना बाबतही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. बाळासाहेब थोरात यांना माहिती दिली आहे विविध मागण्यांसाठी चंद्रपूरात सुरु असलेल्या महसूल कर्मचा-र्यांच्या आंदोलनाला काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कर्मचा -यांच्या मागण्या समजून घेतल्या होत्या. यावेळी कर्मचा-यांच्या मागण्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापूढे मांडण्याचे आश्वासन आमदार जोरगेवार यांनी आंदोलक कर्मचा-यांना दिले होते. त्यांनतर लगेच आज बुधवारी आमदार जोरगेवार यांनी मुबंई येथील मंत्रालयात बाळासाहेब थोरात यांची भेट घेत महसूल कर्मचा-यांच्या मागण्यां त्यांच्या पूढे ठेवल्यात.
नागपूर, कोकण, नाशिक तसेच इतर विभागाचे अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालयात दिड ते दोन वर्षापासून प्रलंबित ठेवण्यात आले आहे. तसेच महसूल विभागातील सहायकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त ठेवण्यात आली आहे. परिणामी कर्मचा-यांचा अभाव निर्माण झाला असून एका महसूल सहायकाला दोन ते तिन संकलनाचा कार्यभार सांभाळावा लागत असल्याची बाब यावेळी आमदारजोरगेवार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या लक्षात आणून दिली. तसेच महसूल कर्मचा-यांच्या मागण्या न्यायक असून त्या सोडविण्यात यावा अशी मागणी केली आहे. यावेळी सदरहु मागणी संदर्भात आमदार जाेरगेवार यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात आजच बैठक घेत सदरहु मागण्या सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न केल्या जातील असे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आ. जोरगेवार यांना दिले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close