ताज्या घडामोडी

गोंडपिपरीत वाघाचे कातडे पकडले पाच जणांना अटक

वनविभागाच्या दक्षता पथकाची कार्यवाही.

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

गोंडपिपरी शहरातील मुख्य मार्गावर एका बार च्या समोर दुचाकी वाहनाने वाघाची कातडी आणत असताना गोंडपीपरी वनविभागाने पकडल्याची घटना दि.14 नोव्हेंबर रोजी रवीवारच्या रात्री घडली.

वाघाच्या कातडीची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाच्या दक्षता विभागाला मिळाली.त्यांनी सापळा रचून दुचाकी स्वाराना पकडले.
यात वाघाचे कातडे आढळून आले.
याप्रकरणी अधिक चौकशी केली असता.एकून पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले.रविवारला रात्री सात वाजताच्या सुमारास गोंडपिपरीच्या मुख्य मार्गावर
हि कार्यवाही करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार दिनांक 14 नोव्हेंबर रोज रविवार अहेरी मार्गावरून चंद्रपूर च्या दिशेने मृत वाघाचे अवयव येत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाच्या दक्षता पथकाला मिळाली.त्यानुसार वनविभागाच्या दक्षता समितीचे पथक गोंडपिपरी येथील मुख्य मार्गावर गस्त ठेवून बसले असता सायंकाळी स्थानिक रोहित बार समोर दुचाकीवर दोन बाईक स्वार संशयित स्थितीत दिसले.पथकांनी चौकशी केली असता वाघाचा कातडे असल्याचे आढळून आले.
दोन आरोपींना वनविभागाच्या पथकांनी अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता या प्रकरणातील आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली.

सदर आरोपी हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ,भामरागड परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. सदर घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक मुंडे , RFO गादेवार यांनी रात्रीच गोंडपिपरी येथील वनविभागाच्या कार्यालय गाठून आरोपींची चौकशी केली. चौकशी दरम्यान आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात असून लवकरच वनविभाग त्यांना जेरबंद करणार असून या प्रकरणातील खरा चेहरा लवकरच समोर येण्याचे चिन्ह आहे.
दि.15 नोव्हेंबर रोज सोमवारला वनविभागाकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित अधिकारी यांचेकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close