ताज्या घडामोडी

फिस्कुटी येथे घरकुल मार्टची सुरवात व विविध उत्पादनाचे प्रदर्शन

तालुका प्रतिनिधी : हेमंत बोरकर

आज दि 15/02/2021 रोजी समता ग्रामसंघ, फिस्कुटी ता. मुल जि. चंद्रपूर या ठिकाणी मा. राहुल कार्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून घरकुल मार्टची सुरवात करण्यात आली.तसेच विविध उत्पादनाचे कार्यक्रमा मध्ये प्रदर्शन करण्यात आले. सदर ग्रामसंघला CIF निधी उमेद अभियानातून प्रॉप्त आहे . घरकुल मार्ट करिता 50 हजार रुपये प्राथमिक स्तरावर गुंतवणूक करण्यात आली. मार्ट मध्ये सिमेंट, सिमेंटची दारे खिडक्या, व गीट्टी,पाईप, घरबांधकामाला लागणारी सर्व साहित्य तालुक्याच्या दरात उपलब्ध करण्यात आले सदर घरकुल मार्टचे उदघाटन मा.चंदुभाऊ मारगोनवार पं स. सभापती मुल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मा. वर्षाताई ताकलपल्लीवार अध्यक्ष तुलसी प्रभागसंघ बेम्बल जुनासुरला होते तर प्रमुख पाहुणे मा. जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, मा. मोहित नैताम, तालुका अभियान व्यवस्थापक मा. प्रकाश तुरानकर, मा. पुरुषोत्तम वाढ़ई पो.पा. फिस्कुटी, मा. रामटेके ग्रामसेवक, तालुका व्यवस्थापक मा. नीलेश जीवनकर,मा. स्नेहल मडावी, जयश्री कामडी, वसीम काज़ी, प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर, अमर रंगारी, रूपेश आदे व तालुक्याची संपूर्ण टीम आणि समूह संसाधन व्यक्ती, ग्रामसंघाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले . घरकुल मार्ट कार्यक्रमाचे संचालन सौ. इंद्रायणी जेंगठे वर्धिनी यानी केले प्रस्ताविक सोनू शेंडे समता ग्रामसंघ सचिव यानी केले तर आभार प्रदर्शन सौ. तिलोत्तमा मानकर ICRP यानी मानले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close