युवकांनी राष्ट्रविकासाठी जीवन कौशल्ये संपादीत करावीत –प्रा. डाॕ.रमेश शिंदे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पाथरी येथील स्व. नितीन महाविद्यालय आणि स्वा.रा.ती.म.वि.नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बहिःशाल व्याख्यान मालेचे पहिले पुष्प गुंफतांना प्रमुख व्याख्याते म्हणून डाॕ,रमेश शिंदे बोलत होते.भारतरत्न डाॕ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते.त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षातआणण्यासाठी आणि युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी जीवनाला उपयुक्त कौशल्ये संपादीत करून राष्ट्रविकासात आपले योगदान द्यावे असे युवकांना संबोधीत करतांना म्हटले.
बहिःशाल व्याख्यानमाला संमारंभाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पूजन करुन झाली.यावेळी व्यासपिठावरील मान्यवरांचा शाॕल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डाॕ.मोरे जी. जे यांनी केले.
व्यासपिठावार कार्यक्रमाचे अध्यक्षम्हणून उपप्राचार्य डाॕ. एस. टी .सामाले,बहिःशाल शिक्षण केंद्र प्रमुख डाॕ.मोरे जी.जे. डाॕ.भारत निर्वळ. प्रा ईंजेगावाकर ए जी.प्रा.बोचरे जे. एम.प्रा.डाॕ खेडेकर एम यू उपस्थित होते.युवकांनी विचारलेल्या प्रश्नंना प्रा.रमेश शिंदे यांनी समर्पक उत्तरेदिली.
अध्यक्षीय समारोप करतांना उपप्राचार्य डाॕ.सामाले एस. टी म्हणाले की नोकरी मिळविणे हेच जीवनाचे सर्वस्व नाही.युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार उद्योजक बनावे. यावेळी त्यांनी परिसरातील यशस्वी उद्योजगांची उदाहरणे दिल्यामुळे अध्यक्षीय समारोप अंत्यत प्रत्ययकारी झाला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.बोचरे जे.एम.व डाॕ.पवार मॕडम यांनी परिश्रम घेतले.शेवठी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार मोरे जी. जे यांनी मानले.