नेरी ग्राम पंचायत गावातील समस्यांबद्दल अनभिज्ञ
खासरदानिलगतच मुख्य रस्त्याला पडलेला मोठा गड्डा
उपसंपादक: विशाल इन्दोरकर
चिमूर तालुक्यातील नेरी हे एक महत्वाचे मोठे गाव आहे. नुकतेच नगर पंचायत चा दर्जा मिळणार अशी चर्चा आहे. परंतु सध्याच्या ग्रामपंचायत चे गावाच्या सोयीसुविधांबद्धलची कामे बघितल्यास त्यांच्या कार्यपद्धतीत किती वणवा आहे हे दिसून येईल. चिमूर मार्गे येता शंकर मंदिरापासून प्रथम मोठा मार्ग गावात येतो जेथून आजूबाजूच्या व गावातील लोकांची येण्याजाण्याची खूप वर्दळ असते. कामगार स्त्रिया पुरुष, सायकलस्वार, ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी इत्यादी वाहनांची रोजची ये जा या मार्गे असते. परंतु आधीचे निरुंद व अर्धवट सिमेंट रोडमुळे होणाऱ्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे. याच रस्त्याच्या कडेला नदीला जाणारा पाट आहे ज्याचे पूल तुटलेले आहे. आणि थोडे समोर जाता नदीच्या खासरदानिलगतच मुख्य रस्त्याला मोठा गड्डा पडलेला आहे.
लोकांच्या वर्दळीत किंवा अनवधानाने या ठिकाणी अपघात होण्याची श्यक्यता खूपच बळावली आहे. सोबतच याच रस्त्याला गाव लागतो तिथे वीज खांबाची इतकी जीर्ण अवस्था झाली आहे की तो केव्हा कुणाच्या अंगावर पडेल व जीवित हानी होईल याचा नेम नाही. तिथेच अंगणवाडी सुद्धा आहे. दिवसरात्र आवाजाही सुरू असणाऱ्या या रस्त्यावरून रात्री बाया मानसं सरकारी शौचालयात येत असतात. परंतु ऐन पावसाळ्यात भैसारे यांच्या घरापासून ते तिडके यांच्या घराकडे येणारा रस्ता व आत विहाराकडे जाणारा रस्ता यावरील खांबावरचे बल्ब जास्तीत जास्त वेळ रात्रीला बंद असतात. त्यामुळे अंधारात वावर करावा लागत असून विषारी कीटक जंतू सर्प यांचा दंश होण्याची शक्यताही बळावली असून त्यास जबाबदार कोण असा लोकांचा प्रश्न आहे. रस्ता-खांब-तुटलेला पूल-व-गड्डा याबद्दल शांती वार्डातीलच गणपतजी चांदेकर यांचे सह गावकऱ्यांनी नेरी ग्रामपंचायतला माहिती देऊनही या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीपासून सरकारी दवाखाना ते बाजार मुख्य मार्गाबद्दल आधीच जनता ताशेरे ओढत असताना इकडे शंकरजी देवस्थान रस्त्याची दुर्दशा सुधारत नाही आहे. त्यामुळे नेरीवासीयांसाठी दोन्ही प्रमुख मार्ग धोक्याचे झाले आहेत. आता स्थानिक प्रशासन यावर काय उपाययोजना करेल याकडे नेरीवासीयांचे लक्ष लागून आहे.