खा.सुनिल मेंढे यांच्या हस्ते अग्निशमन वाहनांचा लोकार्पण
ग्रामीण प्रतिनिधी : टिकेस्वर चेटुले दिघोरी
भंडारा शह,राच्या सुरक्षेच्या दृष्टीने १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत नगर परिषद भंडारा येथे अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्ष खा.सुनिल मेंढे यांच्या हस्ते पार पडला.
अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्याकरिता अत्याधुनिक अश्या अग्निशमन वाहनांचा समावेश भंडारा नगर परिषदेच्या अग्निशमन दलात करण्यात आला.
शहराचा वाढता विस्तार व घडणारे अपघात या दृष्टीने अनेक दिवसांपासून अत्याधुनिक अग्निशमन वाहनाची आवश्यकता होती. सदर मागणीचा नगराध्यक्ष खा.सुनील मेंढे यांनी सकारात्मक विचार करून १४ व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी मंजूर करत प्रलंबित मागणी पूर्ण करून भंडारा शहराच्या सेवेसाठी अग्निशमन वाहन सज्ज करून दिले.
याप्रसंगी मुख्याधिकारी श्री. विनोद जाधव, श्री.कंवलजीतसिंग चढ्ढा, श्री.विनयमोहन पशिने, श्री.शमीम शेख, श्री.बाबू बागडे, श्री.आशु गोंडाणे, श्री.कैलास तांडेकर, श्री.संजय कुंभलकर, श्री.उमेश ठाकरे, श्री.मंगेश वंजारी, श्री.बंटी मिश्रा, श्री.मकसूद बन्सी, श्री.दिनेश भुरे, श्री.जाबीर मालाधारी, श्री.सुनिल साखरकर, श्री.विक्रम उजवणे, श्री.नितीन धकाते, सौ. कविता भोंगाडे, सौ.चंद्रकला भोपे, कु.आशा उईके, सौ.भूमेश्वरी बोरकर, सौ.मधुरा मदनकर, सौ. साधना त्रिवेदी, सौ.वनिता कुथे, सौ.स्मिता सुखदेवे, सौ.शामिमा शेख, सौ.गिता सिडाम, सौ.ज्योती मोगरे, सौ.कल्पना व्यास, सौ. जयश्री बोरकर, जुमला बोरकर, सौ.लता बागडे, सौ,शुभांगी खोब्रागडे, सौ.अश्विनी बुरडे, अखतरी बे.मो.अ.सलाम हाजी, सौ.स्मिता सुखदेवे, श्री.मनोज बोरकर, श्री.विकास मदनकर, श्री.अजीज शेख, श्री.भूपेश तलमले, श्री.रोषण काटेखाये, श्री.पप्पू भोपे, श्री. जुगल भोंगाडे, श्री. शेलेश मेश्राम, श्री.शिव आजबले, श्री.अविनाश ब्राम्हणकर, श्री.लोकेश खोब्रागडे, श्री. फहीम सय्यद, श्री. नरेंद्र बुरडे, श्री. प्रदीप सुखदेवे, श्री. हरीश मोगरे सर्व न.प. कर्मचारी वर्ग तसेच नागरिक उपस्थित होते.