सावरी (बिड) येथिल प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नव्या सुसज्ज ईमारतीत हलवा प्रहार सेवक यांची मागणी
प्रहार सेवक विनोद उमरे यांनी आमदार बंटी भागडीया चिमूर निर्वाचन क्षेत्र यांना दिले निवेदन
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारतीचे बांधकाम एक वर्ष पूर्ण होऊ नही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे . प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी नविन ईमारत बांधूनही येथिल कारभार जीर्ण ईमारतीत सूरु आहे जीर्ण इमारतीत रुग्णांना योग्य ते सोय – सुविधा नसल्याने रुग्णांना अडचन जात आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नव्या इमारतीत हलविण्यात यावे या,अशी मागणी प्रहार सेवक,विनोद उमरे यांनी आमदार बंटी भागडीया यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.चिमूर तालुक्यातील सावरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ४२ गावांचा समावेश आहे . त्यामुळे येथील रुग्णांना योग्य सोय _ सुविधा मिळत नाही त्या करिता नव्या सुसज्ज इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार हलविण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक यांनी निवेदनातून केली त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक , विनोद उमरे, मुरलीधर रामटेके , सत्यपाल गजभे, स्वप्नील खोब्रागड, स्वप्नील पाटील, प्रशांत शेडमाके, सुभाष भोयर,सुशांत खोब्रागडे, रमेश वाकडे आदी उपस्थित होते.