ताज्या घडामोडी

समता प्रभागसंघाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


प्रतिनिधी:हेमंत बोरकर

मौजा खडसांगी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित समता महिला प्रभागसंघाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी प्रभागसंघाच्या अध्यक्ष सौ. वंदना गुडधे, सचिव सौ. संगीता मेश्राम, कोषाध्यक्ष सौ. अनुसया नेहारे व महिला सदस्य तसेच अभियानातील कर्मचारी हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक यांच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.


पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, प्रत्येकाने आपल्या परिसरात किमान एक तरी झाड लावून त्याची नियमित काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समता महिला प्रभागसंघ, श्री . हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, व्यवस्थापक सौ. शितल थुटे, पशु व्यवस्थापक पुंडलिक गेडाम, CRP किरण ढोक, दिशा कोयचाडे, पुष्पलता वाढई, ज्योती निखाडे, वर्षा थुटे ममता सरपाते, पुष्पा थुटे, पौर्णिमा गराटे, स्नेहा श्रीरामे, वनश्री दडमल व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *