परभणीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शन प्रश्नावर ५ सप्टेंबर रोजी विशेष मार्गदर्शन बैठक

ॲड. युवराज बारहाते करणार मार्गदर्शन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
१ सप्टेंबर २०१४ पूर्वी आणि त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वाढीव पेन्शनच्या प्रलंबित प्रश्नावर पुढील कायदेशीर दिशा ठरवण्यासाठी परभणी येथे विशेष मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.ही बैठक शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता डी.एस.एम. कॉलेज, परभणी येथे होणार आहे.

वाढीव पेन्शन हा अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि हक्काचा विषय आहे. या प्रश्नावर कायदेशीर मार्गाने तोडगा कसा काढता येईल आणि भविष्यातील न्यायालयीन रणनीती काय असावी, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.या बैठकीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. युवराज आर. बारहाते हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते पेन्शनविषयक कायदेशीर तरतुदी, सद्यस्थिती आणि पुढील वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.तरी परभणी जिल्हा व परिसरातील सर्व संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या बैठकीस वेळेवर व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.









