आदिवासी विविध कार्य.सहकारी संस्था वहाणगाव येथे सभासद प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी:हेमंत बोरकर
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या पुणे द्वारा संचालित सहकार प्रशिक्षण केंद, चंद्रपूरचे वतीने व सहकार विभाग चंद्रपुर यांचे वतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था वहाणगाव येथे संस्थेचे सभासदांना सहकार विषयांचे प्रशिक्षण संस्थेचे सभागृहात पार पडले.

याप्रंसगी कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक सहकार प्रशिक्षण केंद्र,चंद्रपूर चे उपप्राचार्य भारत सी.फलके, उपप्राचार्य, संस्था अध्यक्ष पुं. झी. चौखे, उपाध्यक्ष युवराज शा.भोयर यांचे उपस्थितीत गरीमामय वातावरणात संपन्न झाले.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री.पुंडलिक झी.चौखे होते.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारत सी.फलके यांनी सहकारी कायद्यातील सहकारी शिक्षण, प्रशिक्षणाचे महत्व व तरतुदी विषद करतांनाच कायद्यातील तरतुदी, सहकारी संस्थेचे उद्देश व संस्था विकासासाठी आधुनिक व्यवस्थापनाचे तसेच विपणनाचे महत्व स्पष्ट करुन या संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाला सक्षम करण्यासाठी मोलाची भुमिका बजावतात,सभासदांच्या अपेक्षित गरजा पूर्ण करुन विकास होत आहे. त्यामुळे सहकारी चळवळ ही जनतेने जनतेसाठी चालविलेली चळवळ असल्याने या संस्थांचा कारभार सहकारी तत्वावर लोकशाही पध्दती सोबतच शिस्तीने व पारदर्शक तसेच कायदा व नियमांने होणे आवश्यक आहे. नियंत्रण व व्यवस्थापनात सभासदाची निर्णायक भुमिका व सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे.
सहकारी संस्थांचे सक्षमिकरण व आत्मनिर्भरता या दृष्टीने भारत सरकारच्या केंद्रीय सहकार मंत्रालयाने अनेक पावले उचलली असुन त्यात संगणीकीकरण व अनेक ग्रामीण व्यवसायाची माहिती यावेळी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पुंडलिकराव चौखे यांनी संस्था प्रगतीसाठी आयोजिलेल्या सभासद सहकारी प्रशिक्षणातून बरीच तांत्रिक व कायदेशिर बाबी प्रथमत:च मोलाची माहिती मिळाल्याचे स्पष्ट करुन यापुढे दरवर्षी आमसभेत प्रशिक्षण घेण्याची विनंती प्रशिक्षक यांना केली.
कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन संस्था सचिव एम. सी. मत्ते यांनी केले. प्रशिक्षनाचा 96 सभासदांनी लाभ घेतला.









