पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे कामावर रुजू करून घेणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे: आम आदमी पक्ष धावून आले मदतीला
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
आज दि. ०१/०२/२०२१ रोज सोमवार ला जिल्हाधिकारी यांच्याकडे नेरी-चिमूर येथील पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. काही वर्षांपासून स्थगित असलेल्या जागांवर शासनाने अनुमती देऊनही पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना रुजू केलेले नसल्याने त्या कर्मचाऱ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. यावर उपाय निघावा म्हणून आम आदमी पक्षाचे चिमूर-नागभीड विधानसभा अध्यक्ष डॉ अजय पिसे आधीपासून पाठपुरावा करीत आहेत, ते या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी माहिती घेत आहेत. वारंवार अर्ज करून ,जिल्ह्याच्या वारी करूनही प्रशांनाकडून दुर्लक्षित झालेले हे कर्मचारी हवालदिल झालेले आहेत. डॉ अजय पिसे यांनी यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठांसोबत बोलणी केली आणि आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री सुनील मुसळे साहेब सोबत जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी यांना सोबत घेऊन या कर्मचार्यांच्या मदतीला धावून आले. जिल्हाधिकारी कार्यालयातून या प्रकरणाचा त्यांनी पूर्ण आढावा घेतला. त्यात असे आढळून आले की प्रशासनाकडून खूपच दुर्लक्ष व टाळाटाळ झालेली दिसत आहे. म्हणून मुसळे साहेबांनी या पदविधर अंशकालीन लोकांना लवकरात लवकर रुजू करून घ्यावे याबाबत मागणी लावून धरली. प्रशासकीय अधीक्षकानी ही केस लवकरात लवकर पूर्ण करू असे तोंडी आश्वासन दिले व येणाऱ्या चार पाच दिवसांत ह्यावर योग्य कारवाई दिसून येईल असे सांगितले.
आधीच बेरोजगारीने त्रस्त हे अंशकालीन कर्मचारी शंभर कि मी ची पायपीट वारंवार करू शकत नाही. प्रशासनाचे खेटे झिजवून मेटाकुटीला आलेल्या ह्या कर्मचाऱ्यांसाठी आप चे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे व जिल्हाकोषाध्यक्ष भिवराज सोनीजी यांनी येत्या १० दिवसांत जर काही योग्य निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व आप च्या पदाधिकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाचा कडक इशारा दिलेला आहे. प्रशासन यावर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्याकडून नेरी-चिमूर चे भीमराव बनसोड, प्रकाश पाटील, भारत बोकडे, राजेंद्र नन्नावरे, माणिक पिसे, वासनिक, प्रशांत रामटेके, राष्ट्रपाल डांगे, कचरू पाटील, बाबा मेश्राम, पोईतराम गभने व वनदेव दुधे इत्यादी आलेले होते.