ताज्या घडामोडी

वाचनाच्या सवयीमुळेच जीवन यशस्वी होते:- सौ.भावनाताई नखाते

दिनांक 08/08/2026 वार शनिवार रोजी राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा “मी ज्ञानी होणार” या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाच्या प्रसंगी सौ.भावनाताई नखाते या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला या संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे,वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे,पाथरी शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.अजय तौर,सोमनाथ डोंगरे,सुरेश पवार,संजय चिंचाने,प्रस्तुत विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ यादव,मुख्याध्यापक किशन डहाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ.भावनाताईंनी विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून घ्यावी तसेच मोबाईल पासून दूर राहावे.पुस्तके घेऊन त्या पुस्तकांचे वाचन करावे. वाचनामुळेच जीवन यशस्वी होते.वाचनामुळे व स्पर्धा परीक्षेमुळे आपण जीवनातील यशाचा मार्ग सोयीस्कर करू शकतो असे प्रतिपादित केले.
या परीक्षेतून भविष्यात आयएएस अधिकारी घडावेत असा उद्देश या संस्थेचा असल्याचे प्रतिपादन सचिन लांडगे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नवनाथ यादव यांनी केले तर डॉ. अजय तौर, सचिन लांडगे सर ,सोमनाथ डोंगरे,सुरेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात तालुक्यातील शांताबाई नखाते प्राथमिक विद्यालय,जि.प. रेनापुर,बोरगव्हाण,जि.प.वडी,जि.प.लोणी,सी.पी.एस.मानवत,जि.प.रेणापूर सह एकूण 13 शाळेतील जवळपास 40 विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र,सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन संस्थेच्या वतीने पालक व मार्गदर्शक शिक्षकासह विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला आयोजित मी ज्ञानी होणार राज्यस्तरीय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव सौ.भावनाताई नखाते,राजर्षी शाहू महाराज सामाजिक संस्था खोंदला या संस्थेचे अध्यक्ष सचिन लांडगे सर,वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रोहिदास टेंगसे,मुख्याध्यापक नवनाथ यादव, मुख्याध्यापक किशन डहाळे,जि.प.रेणापूरचे सहशिक्षक सोमनाथ डोंगरे,गुणवंत विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षक व पालक आदी दिसत आहेत.
कार्यक्रमास विद्यार्थी,पालक व संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close