ताज्या घडामोडी

भिसी येथे पतसंस्थांचे संचालक यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

प्रतिनिधी:विश्वनाथ मस्के

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे द्वारा संचालीत सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिमुर व जिल्हा निबंधक यांचे संयुक्त विद्यमाने भिसी येथे पत पुरवठा सहकारी संस्थांचे संचालक, सेवक यांचे प्रशिक्षण संपन्न झाले.

आदर्श जनता विद्यालय भिसी येथे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जनता विद्यालय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ह.यु. उगे होते तर उद्घाटक म्हणुन चिमुर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कृष्णाजी तेजने उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुखदेव बोरकर, सहकार अधिकारी वर्षाताई भोज, बॅकींग तज्ञ एस. एस.भलमे, एन.जी. गावंडे उपस्थित होते.

सहकार प्रशिक्षण केंद्र चंद्रपुर चे उपप्राचार्य बी.सी. फलके यांनी पतसंस्था पदाधिकाऱ्यांची जबाबदारी, कर्तव्य, बॅकींग, व्यवहार कर्जपुरवठा, संस्थेच्या प्रगतीसाठी करावयाची कामे, सहकारी कायदा, आदर्श नियमावली, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक, कर्ज वसुली आदि विविध विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणाचे समारोपीय कार्यक्रम चंद्रपुर जिल्हा सहकारी बोर्डाचे माजी संचालक देवेंद्रजी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात संजय गिरडे, वसंता घानोडे यांनी प्रशिक्षणाबाबत समाधानकारक प्रतिक्रीया व्यक्त केल्या. रविंद्र चाचरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close