चिंधीचक येथे शेतकऱ्याची आत्महत्या
ग्रामीण प्रतिनिधी : कु. कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड
नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत चिंधीचक येथील शेतकरी इसम चार दिवसा आधी बेपत्ता होता,आज त्याचा शव त्याच्याच शेतात सडलेल्या अवस्थेत सापडुन आला त्या शेतकऱ्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे .
दिवाकर कवडू चौधरी रा. चिंधीचक असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून तो चार दिवसा पासून बेपत्ता होता. आज मृतकाचा मुलगा शेतावर गेला असता शेतामध्ये त्याला दुर्गंधी येत होती दुर्गंधी च्या दिशेने मुलगा गेला असता त्याला त्याच्या वडिलाचे शव सडलेल्या अवस्थेत झाडाखालि पडून दिसले .तसेच झाडाला दोरी अटकलेली होती .त्यामुळे वडिलाने आत्महत्या केल्याचे अंदाज घेऊन नागभीड पोलिसांना माहिती दिली .
पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा व शवविच्छेदन करून शव कुटुंबाला देण्यात आले .मृतकला पत्नी ,दोन मूली व चार मूल असा मोठा आप्त परिवार आहे , आत्महत्येचे कारण कळु शकले नाही पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे .