ताज्या घडामोडी

ब्रम्हपुरीच्या ई-लायब्ररी ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी सामाजिक संघटनाची मागणी

तालुका प्रतिनिधी:सनम टेंभुर्णे

ब्रम्हपुरी शहरातील ई लायब्ररी ला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी संघटनानी एकत्र येऊन मागणी केलेली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला शिक्षण, सामाजिक न्याय आणि राज्यघटनेच्या निर्मिती द्वारे देशाला अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या योगदाणामुळे करोडो युवकांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली असून समाजात समता, बंधुता आणि प्रगतीचा मार्ग प्रस्तापित झाला. यामुळे या ई लायब्ररी ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे त्यामुळे त्यांच्या कार्याला योग्य अभिवादन ठरेल. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ई-लायब्ररी हे नाव तातडीने देण्यात यावे अशी मागणी सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close